वृत्त क्रमांक
आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त "कर्मयोगी" प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे कुसुम सभागृह येथे आयोजन
प्रसिद्ध प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांचे प्रबोधन, प्रसिद्ध गायक रविराज भद्रे व मंजुषा शिंदे यांचे प्रबोधनात्मक गायन
नांदेड दि. १७ फेब्रुवारी:-महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले.त्यातीलच एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा, समस्त मानव जातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी, परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छते’चा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपराचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने मा.सांस्कृतिक कार्य मंत्री, ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे.
संत गाडगेबाबा याच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कर्मयोगी या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रतील प्रसिद्ध प्रबोधनकार व सप्तखंजीरी वादक श्री पवन महाराज दवंडे,अमरावती यांचे प्रबोधन होणार आहे. तसेच स्थानिक कलाकार रविराज भद्रे यांचा गीत गायनाचा कार्यकम सादर होणार आहे. प्रमुख आकर्षण म्हणजे मंजुषा शिंदे यांचे प्रबोधनात्मक गायन असणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. अशिष शेलार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन होत असून, या सांस्कृतिक कार्यक्रमास शहरातील महापौर, प्रशासकीय अधिकारी व स्थानिक कलाकार प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संघ,महिला मंडळ,भजनी मंडळ, प्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत समाजसेवक लोककलावंत व नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन सांचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
०००००


No comments:
Post a Comment