Thursday, February 26, 2026

 वृत्त क्रमांक  247

माजी सैनिकांसाठी भरती मेळावा  

नांदेड, दि. 26 फेब्रुवारी :-  मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावी (कर्नाटक) येथे डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डी.एस.सी.) एन.सी.ओ. भरती मेळावा (जी.डी. आणि क्लर्क) मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित टेटोरियल आर्मीच्या माजी सैनिकांसाठी 16 मार्च 2026 पासून रेजिमेंट सेंटरमध्ये शिपाई आणि क्लर्कसाठी डी.एस.सी. मध्ये नोंदणीसाठी डी.एस.सी. एन.सी.ओ. भरती मेळावा आयोजित करण्याचे वेळापत्रक आहे. 

नियुक्त झालेल्या माजी सैनिकांना शारीरिक चाचणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतीय सैन्यातील व्यक्तीला लागू असलेल्या संयुक्त शारीरिक चाचणी (सी.पी.टी.)साठी चाचणी घेणे आवश्यक आहे. ही चाचणी भारतीय सैन्याच्या वयानुसार संरक्षण सुरक्षा कॉर्प्स (डी. एस. सी.) मध्ये पुन्हा नोंदणीसाठी घेतली जाईल. माजी सैनिकांना सदर रॅली दरम्यान कॉम्बॅट ड्रेस आणि डी.एम.एस. आणण्याचा सल्ला देखील दिला जातो. इच्छुक असलेल्या माजी सैनिक यांनी दिलेले वेळेवर बेळगावी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...