Thursday, February 26, 2026

 वृत्त क्रमांक  249

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

नांदेड, दि. 26 फेब्रुवारी :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व जतन व संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना पारंपारिक कार्यक्रमासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून विविध माध्यमाचा वापर करुन मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करावा अशा सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...