नाणी
वैध मुद्राच्या रुपात
स्वीकारण्याचे
आवाहन
नांदेड,
दि. 25 :-भारतीय रिझर्व्ह बँकेच्या
परिपत्रकानुसार एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी चलनात आहेत. लोकांच्या दैनंदिन
व्यवहारात देवाण-घेवाणसाठी नाणी बँकेमार्फत वाटप करण्यात येतात. नाणी ही चलनात वैध
असल्यामुळे नाणी नाकरणारे दंडात्मक कार्यवाहीसाठी पात्र होऊ शकतात. ग्राहकाकडून
बँक शाखेच्या कॉउंटरवर जमा करण्यासाठी दिलेली नाणी बँकांनी स्वीकारणे बंधनकारक
आहे. यासंदर्भात कोणताही गैर अनुपालन भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या
निर्देशांचे उल्लंघन आणि वेळोवेळी लागू असलेल्या दंडात्मक उपायासह कारवाईचे
उल्लंघन म्हणून पाहिले जाईले, असे जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात
नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment