संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्रातील
कामकाजासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड
दि. 25 :- संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्राचे दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी पात्रताधारक स्वयंसेवी
संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून इच्छूकांना विहीत नमुन्यातील अर्ज
गुरुवार 31 जानेवारी 2019 पर्यंत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय गणेशकृपा
शास्त्रीनगर (भाग्यनगर जवळ) नांदेड येथे उपलब्ध राहील, असे आवाहन जिल्हा महिला
बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नमुद मान्यताप्राप्त
स्वयंसेवी संस्थांकडून 5 फेब्रुवारी 2019 अखेर अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा
महिला बालविकास कार्यालयाचे प्रमाणित केलेल्या अर्जाच्या प्रतींचा निवड
प्रक्रीयेदरम्यान विचारात घेतल्या जाणार आहेत.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून
नांदेड जिल्ह्यासाठी संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात लाल बहादुर शास्त्रीनगर नांदेड येथे नारायण कामाजी
गोरे यांची इमारत रविदास निवास येथे जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व
कायदेशिर मदत इत्यादी तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यान्वीत करण्यात आले आहे.
या केंद्राचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे चालविण्यासाठी
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्राच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची
निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार नांदेड
जिल्ह्यातील महिलांविषयक कायदे व योजनांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था,
महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था, अशा
स्वयंसेवी संस्थांमधून पात्रताधारक संस्थेची निवड करण्यात येणार आहे, असे
प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment