Friday, January 25, 2019

धर्माबाद येथे दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
धर्माबाद दि 25/01/2019 
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने धर्माबाद शहरात जि.प हायस्कुल,हुतात्मा पानसरे हायस्कुल व केशव प्राथमीक विद्यालय आदी शाळेने सहभाग घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक गावात मतदार जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. येथील धर्माबाद तालुक्यातील मुख्य कार्यक्रमात मा.उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ.सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमात सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त मतदारासाठीची प्रतिज्ञा देण्यात आली.कार्यक्रमाच्या वेळी तहसिलदार धर्माबाद श्रीमती ज्योती चौहान,नगर पालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे,मंडळ अधिकारी तालुक्यातील सर्व तलाठी ,सर्व मतदान केंद्र स्तरिय अधिकारी,आशा वर्कर,अंगनवाडी सेविका,दिव्यांग मतदार,शिक्षक,प्राध्यापक,तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.  
धर्माबाद तालुक्यातील उत्कृष्ठ मतदान केंद्र स्तरिय अधिकारी(बिएलओ) एम आर पडगी, व्ही व्ही भंडारे,जी एल कौडेवार,एस व्ही चिलकेवार,एस के भोसले,बी के तोटावाड,बी ए जोगदंड़,एम पी गिरगावकर,के एम वाघमारे,बी एल पुलकंठवार, आदींना प्रमाणपत्र देण्यात आले. एस एस वाघमारे यांना उत्कृष्ठ बिएलओ व व्हिडीओ क्लिप तयार करुन व मतदार जनजागृती केल्याबदल प्रमाणपत्र देण्यात आले.वक्तृत्व स्पर्धेत निवड झालेले वैष्णवी अनिल आरगुलवार,मणिषा बाभळे,जजगेकर अल्का,निकीता रामराव येवले,सादीया खाजामियॉ शेख ,वैष्णवी प्रकाश पुय्यड,तृप्ती किशनराव हानमुळे,वैष्णवी दादाराव ताटे,रेणुका बालाजी जाधव,रांगोळी स्पर्धेत नांदगावकर विद्या गंगाधर,फुलारी दुर्गा दिलीप,टेकमवार दुर्गा दिलीप,पेकमवार गितांजली गणेशराव,खैरगावे अनुसया हाणमंत,नाईकवाड साक्षी बालाजी,हिवराळे अनुसया नरहारी आदि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.स्पर्धेत धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय,हुतात्मा पानसरे हायस्कुल जिजामाता कन्या शाळा,गुरुकुल विद्यालय,तसेच कारेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आदि शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.  
निवडणूक विभागातील नायब तहसिलदार सुनिल माचेवाड,लिपीक मिलींद टोणपे,ऑपरेटर मोहन शेषेराव भंडरवाड यांना उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
                                               तहसिलदार धर्माबाद

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...