वृत्त क्रमांक
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला नांदेड येथे कार्यक्रम
ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे
नांदेड (जिमाका), दि. २४ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मराठवाडा प्रादेशिक विभाग (ऊ), नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे होणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध कायदे व शासकीय योजनांची माहिती, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत हेल्पलाईन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश शरद देशपांडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचेही मार्गदर्शन कार्यक्रमात लाभणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)चे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment