वृत्त क्रमांक
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव येथे वाहतुकीत बदल
२५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २६ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
नांदेड (जिमाका), दि. २४ : हदगाव येथे दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हदगाव परिसरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ अन्वये प्रदान अधिकारांचा वापर करून दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजेपर्यंत संबंधित वाहतूक बदलास मान्यता दिली आहे.
हदगाव येथील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरून जात असल्याने मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोजेगाव ते मल्लीनाथ हॉटेल, उमरखेडहून हदगावकडे येणारा रस्ता एकतर्फी करण्यात येणार आहे. तसेच उमरखेडहून हदगावकडे येणारी वाहतूक दुतर्फा करण्यात येणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना
वाहतूक बदलाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक, नांदेड यांना देण्यात आल्या आहेत. तसेच हदगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत प्रशासनाने केलेल्या वाहतूक व्यवस्थेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment