वृत्त क्रमांक
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त
एच आय व्ही/ एडस जिल्हास्तरीय रेड रन अंतर्गत धावणे स्पर्धेस जिल्हयातील युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद
नांदेड दि. 14 ऑगस्ट:- आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभाग, श्री गुरगोबिंदसिंघजी मेमोरियल जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विदयमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एच आय व्ही/ एडस जिल्हास्तरीय रेड रन अंतर्गत 5 कि.मी. धावणे व हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन आज सकाळी सायन्स महाविदयालय, नांदेड येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणुन सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अरुणा शुक्ला यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा चिकित्सक डॉ. पेरके, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे, जिल्हा एड्स विभाग संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी माधव सुगावकर, समुपदेशक, जिल्हा एड्स विभाग, नांदेड आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत सरकाने चालु वर्षी राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे 150 वे वर्षे आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली हा उपक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी खेळाडूंनी देशभक्ती वर आधारित घोषणा दिल्या. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एच आय व्ही/ एडस जिल्हास्तरीय रेड रन रॅलीचा मुख्य उददेश म्हणजे युवक-युवती मध्ये एडस प्रतिबंधक करणे व एडस जनजागृती करणे होता. या स्पर्धेकरीता नांदेड जिल्हयातील 17 ते 25 वर्षे वयोगटातील युवक-युवतीनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक संपादन केलेल्या युवक-युवती 23 ऑगष्ट रोजी कोल्हापूर येथे संपन्न होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन नांदेड जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या स्पर्धेचा अंतिम निकाल
17 ते 25 वर्षे युवक- युवती (5000 मी.धावणे) युवक- प्रथम- तन्मय भिमराव सोनाळे, द्वितीय- राजेश गणेश कासारे, तृतिय- वैभव मारोती बोकारे, युवती- प्रथम- मोनिका किशनराव नाईक, द्वितीय – देवसर साहेबराव जगदंबे, तृतिय- विदया गंगाधर साठे
या स्पर्धेकरीता पंच म्हणुन प्रलोभ कुलकर्णी, सचिव, हौशी ॲथलेटिक्स संघटना यांचे मार्गदर्शनाखाली वैभव दमकोडवार, बंटी सोनसळे, वैभव अंभोरे, मोहम्मद अन्वर आदीनी काम केले.
सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे, जिल्हा एड्स विभाग यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, संजय चव्हाण, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विदयानंद भालेराव, यश कांबळे व आरोग्य विभागाचे सोपान ईभीते, प्रकाश झिंझाडे, सुमित सूर्यवंशी, गंगासागर हिंगोले, धाराजी हिंगोले आदीनी सहकार्य केले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment