वृत्त क्रमांक
रेतीसाठ्याचा जाहीर लिलाव 30 जुलै रोजी
नांदेड दि. 24 जुलै :- नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमध्ये शिल्लक असलेल्या रेतीसाठ्याचा जाहीर लिलाव गुरुवार 30 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव उपविभागीय अधिकारी कार्यालय (महसूल), चिखलवाडी परिसर नांदेड येथील सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. या जाहीर लिलावात भाग घेण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींनी आपणाकडे असलेल्या ओळपत्रासह वरील विहीत तारखेसच वेळेवर उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड येथे हजर रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.
नांदेड तालुक्यातील शासकीय रेती डेपोमधील शिल्लक रेतीसाठा पुढील प्रमाणे लिलावासाठी उपलब्ध आहे. नांदेड तालुक्यातील मौ. रहाटी (जुने वाघी) शासकीय रेती डेपोत रेतीसाठा 38 हजार 712 ब्रासमध्ये उपलब्ध आहे. त्याची हातची किंमत प्रति ब्रास रुपये 2 हजार 767 प्रमाणे हातची किंमती 10 कोटी 71 लाख 16 हजार 104 रुपये आहे. तर खुपसरवाडी येथील शासकीय रेती डेपोत 1 हजार 5 ब्रास रेतीसाठा असून हातची किंमत प्रति ब्रास रु. 2 हजार 767 प्रमाणे हातची किंमत 27 लाख 80 हजार 835 एवढी आहे.
लिलावाच्या अटी व शर्ती
जाहीर प्रगटनातील रेतीसाठा नमूद ठिकाणी आहे किंवा नाही, वाहतूकीसाठी आवश्यक रस्ते उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची लिलावापूर्वीच खात्री करून घेण्याची जबाबदारी संबंधीत लिलावात भाग घेणा-या लिलावधारकांची राहील. लिलावानंतर साठ्याबाबत कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. तसेच जप्त साठा आहे त्या स्थितीत लिलाव करण्यात येणार आहे. संबंधीत लिलावधारक जाहीर प्रगटनातील रेतीसाठ्याचे लिलाव घेण्यात येत असून याच रेतीसाठ्याची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात येईल.
लिलावधारकाने लिलावातील अटी व शर्तीचे यथोचित पालनार्थ लिलावात भाग घेण्यापूर्वी 1 लाख रुपये अनामत रक्कम प्रत्येक रेतीसाठयासाठी वेगळी जमा करुनच लिलावात भाग घेता येईल. लिलाव अंतिम झाल्यावर लिलाव धारकास लिलावाची 25 टक्के रक्कम त्याच दिवशी माझ्या समक्ष नगदी स्वरूपात जमा करावी लागेल. जमा रक्कमे बाबतची पोच लिलावधारकास त्याच वेळी देण्यात येईल.
महाखनिज प्रणालीवर लिलावाची 100 टक्के रक्कम 2 दिवसात भरणा केल्यानंतर जमा करून घेतलेली लिलावाची 25 टक्के रक्कम परत करण्यात येईल. लिलावाची पूर्ण 100 टक्के रक्कम लिलावधारकास भरणा केल्याशिवाय रेती वाहतूक परवाना मिळणार नाहीत. लिलावधारकास रेतीसाठा आदेशामध्ये नमुद मुदतीत त्याच्या स्वखर्चाने रेती साठ्याच्या ठिकाणाहून उचल करणे बंधनकारक राहिल. रेतीसाठ्याच्या प्रमाणातच वाहतूक पासेस लिलावधारकास देण्यात येईल.
लिलावाची रक्कम लिलाव अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी 25 टक्के नगदी स्वरूपात व महाखनिज प्रणालीवर चलनाची रक्कम लिलावधारकाने 2 दिवसाच्या आत भरणा न केल्यास संबंधिताची अनामत रक्कम जप्त करुन सदरील लिलाव रद्द करण्यात येईल व सदरील साठ्याचा फेर लिलाव घेण्यात येईल फेर लिलावात पुर्वीच्या लिलावच्या किंमती पेक्षा कमी किंमत आल्यास फरकाची रक्कम पुर्वीच्या लिलावधारकाकडून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल.
लिलावधारकाने रेतीच्या वाहतूकीसाठी सक्षम प्राधिका-याने प्रमाणीत केलेले वाहतूक पास रेती, वाळू वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनासोबत दरवेळी देणे बंधनकारक आहे.
लिलावधारकाने त्याच्या स्थळातील रेती वाळू वाहतूक करणा-या वाहनास त्याच्या वाहन क्षमते इतक्याच परिमाणाची पास द्यावे. कोणतेही वाहन त्यापेक्षा अधिक परिमाणाची रेती वाळू वाहून नेत असल्याचे आढळून आल्यास त्या वाहनावरील संपूर्ण गौण खनिज अवैध समजून त्यावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
सदर गौण खनिज वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनास ARAI सर्टिफाईड ASI 140 मॉडेलचे GPS system बसवूनच गौणखनिज वाहतूक करावी लागेल. वाळूची, रेतीची वाहतूक करताना वाहनातील रेती प्लॅस्टिक पेपरने ताडपत्रीने आच्छादीत करुन रेतीची वाहतूक सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीतच करणे बंधनकारक राहिल. सदरील लिलाव कोणत्याही स्तरावर फेरबदल रद्द करण्याचे पूर्ण अधिकार मा.उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्याकडे अबाधीत राहिल.
सदरील रेतीसाठ्याची हातची किंमत वर नमुद प्रमाणे शासकिय डेपोसाठी स्वतंत्र राहील. याशिवाय गौण खनिज लिलावाची प्रक्रिया राबविताना प्रचलित नियम, कायदे, परिपत्रके व मा. न्यायालयाचे निर्णय यांचे पालन करणे बंधनकारक राहिल. लिलावधारकास लिलावात घेतलेल्या लिलाव साठयाच्या एकुण किंमतीच्या 18 टक्के GST करारा बाबत बॉंडव्दारे हमीपत्र दयावे लागेल, तसेच लिलाव धारकास एकूण रक्कमेच्या 10 टक्के District Mineral Foundation, Nanded ची रक्कम महाखनिज प्रणालीवर भरणा करावी लागेल. वाहतुक पावत्याची रक्कम भरणा करावी लागेल, असेही आवाहन नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली आहे.
000000
No comments:
Post a Comment