वृत्त क्रमांक
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू
नांदेड दि. 24 जुलै :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी 2.0 हे पोर्टल सुरु झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी व 12 वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेशीत अनुसूचितजाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी 2.0 हे पोर्टलवर सर्वप्रथम आधार क्रमांक वापरून महाआयडी तयार करणे बंधनकारक आहे. (नविन/ नुतनीकरण विद्यार्थ्यासाठी) आधारकार्ड वरील माहिती अद्यावत ठेवावे (पत्ता,मोबाईल क्रमांक,ई-मेल) तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना,व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र (जातीचा,उत्पन्नाचा,अधिवास दाखले,इ.शैक्षणिक कागदपत्रे) पीडीएफ स्वरूपात संकलित करून ठेवावे. त्यानंतर अर्ज भरून त्याची हार्डकॉपी महाविद्यालयात जमा करावी. महाविद्यालयानी तात्काळ अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास फॉरवर्ड करावेत. शिष्यवृत्ती अर्ज भरणे हा प्रवेश प्रक्रियाचा भाग असल्यामुळे प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment