Friday, July 24, 2026

वृत्त क्रमांक 

मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, दि. २४ जुलै : आधार बहुउद्देशीय संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड आणि अभिवक्ता संघ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने काल २३ जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या हस्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथील तळमजल्यावरील सभागृहात झाले. शिबिरात अध्यक्ष, जिल्हा अभिवक्ता संघ नांदेड यदुपंत श्यामसुंदर अर्धापुरकर यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून आरोग्याची नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले.

या आरोग्य शिबिराला न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार तसेच कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन केल्यास नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

00000




No comments:

Post a Comment

पंढरपूरच्या पवित्र भूमीतून शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचा शुभारंभ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जम...