वृत्त क्रमांक
विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी
गुरूवार 18 जून रोजी मतदान ; 452 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
नांदेड दि. 16 जून :- महाराष्ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी नांदेड जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण आठ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
मतदान गुरूवार 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.
सदर निवडणुकीमध्ये एकूण 452 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी 224 स्त्री मतदार तर 228 पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्ह्यातील महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.
मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
तहसील कार्यालय किनवट येथील मतदान केंद्रात किनवट नगरपरिषद-24, नगरपंचायत माहूर-17 असे एकूण 41 मतदार मतदानाचा हक्क बजावतील याप्रमाणे तहसील कार्यालय हदगाव या मतदान केंद्रावर नगरपरिषद हदगाव-23, नगरपंचायत हिमायतनगर-19 एकूण 42, तहसील कार्यालय भोकर येथील मतदान केंद्रात नगरपरिषद भोकर-25, नगरपरिषद मुदखेड-23 एकूण 48 मतदार, तहसील कार्यालय नांदेड येथील मतदान केंद्रात अर्धापूर नगरपंचायत-19, नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड-89 असे एकूण 108 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
तहसील कार्यालय कंधार येथील मतदान केंद्रात नगरपरिषद कंधार-23, नगरपरिषद लोहा-23 असे एकूण 46 मतदार तर तहसील कार्यालय धर्माबाद येथील मतदान केंद्रात नगरपरिषद धर्माबाद-25, नगरपरिषद उमरी-23 एकूण 48 तर तहसील कार्यालय बिलोली येथील मतदान केंद्रात नगरपंचायत नायगाव-19, नगरपरिषद बिलोली 23, नगरपरिषद कुंडलवाडी-23 असे एकूण 65 तर तहसील कार्यालय देगलूर येथील मतदान केंद्रात नगरपरिषद देगलूर-31, नगरपरिषद मुखेड-23 असे एकूण 54 मतदार आहेत. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील एकुण 452 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
त्यानंतर सोमवार दिनांक 22/06/2026 रोजी सकाळी 08.00 वाजता या निवडणुकीची मतमोजणी कॅबिनेट हॉल नियोजन भवन तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होणार आहे.
00000
No comments:
Post a Comment