Thursday, June 19, 2025

 वृत्त क्रमांक 640

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी   

नांदेड, दि. 19 जून :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवार 27 जून रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री गुरूगोविंद सिंघजी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा मेळावा सकाळी 10 वाजेपासून श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था महात्मा फुले पुतळ्याजवळ नांदेड येथे घेण्यात येणार आहे. 

या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजक व स्वयंरोजगार देणारे विविध महामंडळे तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी 27 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगररोड बाबानगर नांदेड nandedrojgar01@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 02462-251674 योगेश यडपलवार मो. 9860725448 येथे संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.   

0000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...