Thursday, June 19, 2025

वृत्त क्रमांक 638

दहावी-बारावी परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, दि. 19 :-  येत्या जून-जुलै मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेतील गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यातील 18 परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमीत केला आहे. 

या परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै 2025 या कालावधीत (सुट्टीचे दिवस व रविवार वगळून) सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी, परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. 

परीक्षा कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिस कॅलक्यूलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटर पर्यंत परिसरात वापरण्या, जवळ बाळगण्या, परीक्षा केंद्रात नेण्या प्रतिबंध केले आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

00000

No comments:

Post a Comment