वृत्त क्रमांक 451
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 28 एप्रिल : महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.
या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 29 एप्रिल 2025 रोजीचे 00.00 वाजेपासून (28 एप्रिल 2025 चे मध्यरात्री 24.00 वाजेपासून) ते 3 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.
संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास
पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment