वृत्त क्रमांक 449
गाडेगाव येथे रेल्वे ओव्हर ब्रिज कामांमुळे
वाहनांसाठी पर्यायी मार्ग
नांदेड दि. 28 एप्रिल : गाडेगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम करण्यासाठी 20 एप्रिल ते 18 मे 2025 कालावधीत पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मान्यता दिली आहे.
निळा जं.शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट हा मार्ग वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. या मार्गासाठी
पर्यायी मार्ग (जाणे-येण्याकरिता) जड वाहनांसाठी शंकरराव चव्हाण चौक-बोंढार तर्फे
हवेली-वाजेगाव-शिकारघाट-मुगट हा राहील. तर दुचाकी व चारचाकी
वाहनांसाठी गाडेगाव-बोंढार तर्फे हवेली ते देगलूरनाका
ग्रामीण मार्ग 37 हा राहील. वाहतुक वळविणे व पर्यायी
मार्गाने सोडण्याबाबत अटी व शर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाची समक्रमांकित अधिसुचना 17 फेब्रुवारी
2025 मध्ये नमुद प्रमाणे कायम असतील, असेही आदेश जिल्हादंडाधिकारी
यांनी स्पष्ट केले आहे.
0000
No comments:
Post a Comment