वृत्त क्रमांक 450
लेंडी प्रकल्प धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 28 एप्रिल : लेंडी प्रधान प्रकल्प मुखेड तालुक्यातील मौ. गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर व धरण लगत असलेली मौ. गोणेगाव, रावणगाव, मारजवाडी, हसनाळ, भाटापुर व इटग्याळ (प.दे) या गावांच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.
या गावांच्या हद्दीत लेंडी प्रधान प्रकल्पाची
होत असलेली कामे, ये-जा करणारी
यंत्रणा, साहित्य व अधिकारी-कर्मचारी यांना विरोध करणारी सर्व गतीविधीस, मोर्चे, धरणे, उपोषणे, आत्मदहन व
त्याअनुषंगाने इतर जमाव करणे यांना 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 26 जून 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. संबंधीतास नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकुण घेण्यास पुरेसा अवधी
नसल्याने, आणिबाणीचे प्रसंगी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल
कर्डिले यांनी 28 एप्रिल 2025 रोजी निर्गमीत केले आहेत.
000000
No comments:
Post a Comment