Monday, February 20, 2017

मुरघास, कडबाकुटी यंत्रासाठी  
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :-  राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास व विद्युत चलीत कडबाकुटी यंत्र 50 टक्के अनुदानावर वापरास प्रोत्साहन या योजनेअंतर्गत गुरुवार 2 मार्च 2017 पर्यंत सर्वसाधारण , अनु. जाती, अनु. जमातीतील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नियम व अटीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीशी संपर्क साधावा व अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...