Monday, February 20, 2017

हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 20 :- हरभरा घाटेआळीसाठी क्लोरपायरीफॉस 20 ई.सी. 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मर रोगासाठी कार्बन्डेन्जीम 2 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, हा कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांनी दिला आहे.  
उपविभागीय कृषि कार्यालय देगलूर यांच्याअंतर्गत देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या पाच तालुक्यासाठी हरभरा पिकासाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकावरील किडरोग सर्वेक्षणाचे काम चालू आहे. किडसर्वेक्षक, किडनियंत्रक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून कृषि संदेश देण्यात आला आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...