Monday, February 20, 2017

एप्रिलमधील व्यवसाय परीक्षेबाबत
आयटीआयचे उमेदवारांना आवाहन
नांदेड, दि. 20 :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आयटीआय ) नांदेड अंतर्गत मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (बीटीआरआय) यांची 105 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 6 ते 12 एप्रिल 2017 या कालावधीत होणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी आयटीआयशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयटीआयतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांची अप्रेटिंसशिप पूर्ण होणार आहेत. अशा विद्यार्थ्यांची ही परीक्षा होणार असल्याने संबंधितांनी शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यंत ज्यांचे अप्रेटिंसशिप पूर्ण होते अशांनी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...