Monday, February 20, 2017

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी
हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक जाहीर
नांदेड, दि. 20 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र दहावी व बारावी परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुख यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आले आहेत. 
इयत्ता 10 वीसाठी 02382-251633 व बारावीसाठी 02382-251733 ही हेल्पलान सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडचणी विषयी हेल्पलाइन क्रमांकावर व नांदेड जिल्हा समुपदेशक बी. एम. कच्छवे 9371261500 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव लातूर यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...