आर्थिक निर्भरता यातच महिलांच्या सुरक्षिततेचा मार्ग
- वर्षा ठाकूर-घुगे
आर्थिक निर्भरता यातच महिलांच्या सुरक्षिततेचा मार्ग
- वर्षा ठाकूर-घुगे
महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य
पाककला स्पर्धेचे शनिवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने नवा मोंढा, नांदेड येथील मैदानावर 1 ते 5 मार्च दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव सुरू आहे. सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शनिवार 4 मार्च 2023 रोजी पौष्टीक तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गटातील व सर्वसामान्य महिला यांनी या तृणधान्य पाककला स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचतगटातील महिला तसेच सर्वसामान्य महिला यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवामोंढा, नांदेड येथील मैदानावर सुरू असलेल्या नांदेड जिल्हा कृषि महोत्सवातील नोंदणी कक्षात 4 मार्च 2023 सकाळी 11 वाजेपर्यंत स्पर्धकांनी नोंदणी करावी. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्त ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा,राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्या पासून बिस्कीट, लाडू, पापड, चिक्की, थालीपीठ, धपाटे,खिचडी, खीर, पराटे,चकल्या, बेकरी पदार्थ इ. असे विविध पदार्थ बनवून आणावेत. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र, भेट वस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
0000
प्रगतशील शेतकरी, महिला बचतगटासह
उत्पादक कंपन्यांचा होणार सत्कार
शेतकरी सन्मान दिवसाचे शुक्रवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 2 :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून 1 ते 5 मार्च 2023 या कालावधी नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन कृषि विभाग, आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने, कृषि उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी जिल्हयातील 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान व जिल्हयातील 16 महिला बचत गट व 5 शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सत्कार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
0000
फायदेशीर शेतीसाठी उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
· शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करुन कृषी उद्योजक व्हावे
नांदेड (जिमाका) दि. 1 :- शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन शेती करावी. शेती करतांना नवतंत्रज्ञान अवगत करुन कृषी उद्योजक होण्यावर भर द्यावा. बाजारात कोणत्या उत्पादनाची मागणी आहे याचा विचार करुन विकेल ते पिकेल या धोरणानुसार उत्पादन घ्यावे. फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांकडे उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कृषि महोत्सव व माविमच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नांदेड, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड येथे करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा सौ. एम. आर. सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, शास्त्रज्ञ डॉ. देविकांत
शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतमालावर आधारित उद्योग उभारावेत. उत्पादन वाढून उत्पादनाच्या विक्रीवरही भर द्यावा यातून शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल. कोरोना कालावधीत शेती व शेती व्यवसायाने साथ दिल्यामुळे बाजारपेठ सुरू राहिली हे विसरता येणार नाही. शेतीची उन्नती झाल्याशिवाय आपली प्रगती नाही. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करुन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
नवीन तंत्रज्ञान, उत्पादने, सर्व योजना, शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलेली प्रगती यासह शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त बाबींची माहिती या मेळाव्यात होईल. शेतीसाठी लागणारे यंत्र, अवजारे यांच्या योजनेची माहिती कृषि विभागाच्या स्टॉलवर मिळेल. तसेच नागरीकांनी आपल्या आरोग्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. पुढील चार दिवस चालणाऱ्या या कृषि महोत्सवातील स्टॉलला नागरिकांनी भेट देवून शेतकरी व बचत गटातील महिलांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करावेत, असेही आवाहन श्री. चलवदे यांनी केले.
महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी
बचतगटाची चळवळ मोलाची
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
या कृषी महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व मेळाव्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. बचत गटांमुळे त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला असून त्या स्वत: चे उत्पादन तयार करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी बचत गटाची चळवळ मोलाची असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी प्रास्ताविक करुन बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तुचे उत्पादन, विक्री याबाबत माहिती दिली. यावेळी न्यायाधीश दलजित कौर जज, शास्त्रज्ञ देविकांत देशमुख, डॉ. शिवाजी शिंदे, प्रल्हाद इंगोले आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
0000
बचत गटांना प्रोत्साहनासाठी नांदेडकरांना जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन
बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री
नांदेड, (जिमाका) दि. 28 :- कृषि महोत्सवासोबत 1 ते 5 मार्च या कालावधीत माविम बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान, नवा मोंढा नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त ग्राहकांनी बचतगटांनाकडून थेट उत्पादित केलेल्या वस्तू व इतर पदार्थाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन केले आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात 35-40 विविध प्रकारच्या वस्तूचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवात विविध विषयावर परिसंवाद, मनोगत, सेंद्रिय परसबाग व बचत गटातील उद्योजकीय महिलांचे मनोगताचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी बचत गटातील महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात जात्यावरील सर्व प्रकारच्या डाळी, तांदळाचे पापड, बांबू पासून तयार केलेल्या वस्तू, तूप, लोणचे व इतर अनेक वस्तू / पदार्थ उपलब्ध आहेत. या महोत्सवात विशेष आकर्षण पौष्टिक तृणधान्याचे आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात नांदेड ग्रामीण व शहरातील नागरिकांनी भेट देऊन बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तु /पदार्थ खरेदी करावेत, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
ग्रामीण गुंठेवारी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल करावेत
नांदेड (जिमाका) दि. 28 :- गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड (चिखलवाडी कॉर्नर नांदेड) येथे गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास 31 मार्च 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करावेत, असे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेशान्वये महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वी
00000
वृत्त दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केंद्रीय पथकाकडून...