बचत गटांना प्रोत्साहनासाठी नांदेडकरांना जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन
बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री
नांदेड, (जिमाका) दि. 28 :- कृषि महोत्सवासोबत 1 ते 5 मार्च या कालावधीत माविम बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान, नवा मोंढा नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त ग्राहकांनी बचतगटांनाकडून थेट उत्पादित केलेल्या वस्तू व इतर पदार्थाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन केले आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात 35-40 विविध प्रकारच्या वस्तूचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवात विविध विषयावर परिसंवाद, मनोगत, सेंद्रिय परसबाग व बचत गटातील उद्योजकीय महिलांचे मनोगताचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी बचत गटातील महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात जात्यावरील सर्व प्रकारच्या डाळी, तांदळाचे पापड, बांबू पासून तयार केलेल्या वस्तू, तूप, लोणचे व इतर अनेक वस्तू / पदार्थ उपलब्ध आहेत. या महोत्सवात विशेष आकर्षण पौष्टिक तृणधान्याचे आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात नांदेड ग्रामीण व शहरातील नागरिकांनी भेट देऊन बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तु /पदार्थ खरेदी करावेत, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment