Friday, October 30, 2026

 वृत्त क्रमांक

वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी 2 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

• ‘एमएच 26-डीएफ’ ही नवीन मालिका 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार

नांदेड, दि. 30 : नांदेड जिल्ह्यातील परिवहनेतर संवर्गातील हलके मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही-एनटी) ‘एमएच 26-डीएफ’ ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका दि. 2 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्त्यासह दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकासाठी विहित शुल्काचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडणे आवश्यक आहे. निर्धारित दिनांक व वेळेनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

एखाद्या पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित अर्जदारांना दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

***

No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...