पासेससाठी माध्यम प्रतिनिधींना सूचना
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश पासेसचे वितरण मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. तरी, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी 2 रंगीत छायाचित्र (पासपोर्ट आकाराचे), आधार कार्ड आणि अधिकृत ओळखपत्रासह सदर कार्यालयात जाऊन प्रवेश पास घ्यावा, ही विनंती.
तसेच, या प्रवेश पासेससाठी यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधींनी अर्ज करू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
— प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
No comments:
Post a Comment