Tuesday, October 6, 2026

वृत्त क्रमांक

प्रगती महिला बचत गटातील 130 महिलांना शास्त्रीय पशुपालन व चारा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

• किनवट येथे दोन दिवसीय प्रशिक्षण

• शेळीपालन, पशुधन आरोग्य व दुष्काळी परिस्थितीतील चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

नांदेड(जिमाका), दि. 6 : पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती किनवट यांच्या वतीने प्रगती महिला बचत गट, किनवट येथील महिलांसाठी दि. 5 व 6 ऑक्टोबर 2026 रोजी दोन दिवसीय पशुपालन व चारा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास बचत गटातील 130 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणादरम्यान महिलांना शेळीपालनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, पशुधनाचे आरोग्य, निकृष्ट चारा सकस करण्याच्या विविध पद्धती तसेच दुष्काळी परिस्थितीत चारा व पाण्याचे योग्य नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निकृष्ट चारा सकस करण्याच्या विविध पद्धतींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.

यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, किनवट डॉ. संजीव पाटील तसेच डॉ. योगेश पाटील, डॉ. उमेश सोनटक्के, डॉ. निरंजन बागल, डॉ. सुनील जाधव, डॉ. राहुल जोंधळे, डॉ. शितल वानखेडे, डॉ. लक्ष्मीकांत ढगारे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांना पशुपालनाच्या विविध बाबींवर मार्गदर्शन केले.

शेळीपालनाच्या माध्यमातून महिलांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, पशुधनाची उत्पादकता वाढविणे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे यासाठी शास्त्रीय पशुपालन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी चाऱ्याची उपलब्धता, योग्य साठवणूक, निकृष्ट चाऱ्याचे सकसीकरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर यांचे महत्त्व प्रशिक्षणातून स्पष्ट करण्यात आले.

महिला बचत गटातील महिलांनी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेळीपालन, चारा व्यवस्थापन, पशुधन आरोग्य आणि दुष्काळी परिस्थितीतील पशुपालन व्यवस्थापन याबाबत माहिती घेतली. या प्रशिक्षणामुळे महिलांना शास्त्रीय पशुपालन पद्धतींची माहिती मिळून पशुपालनाच्या माध्यमातून उत्पन्नवाढ, आर्थिक स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

**



No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...