Tuesday, August 18, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेडमध्ये मोटारसायकल वाहनांसाठी MH 26-DD नवीन मालिका सुरू होणार 

नांदेड, दि. 18 ऑगस्ट : परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांच्या नोंदणीसाठी MH 26-DD ही नवीन मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 

ज्या अर्जदारांना पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांचे अर्ज आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल यासह गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) सादर करणे आवश्यक आहे. 

विहित दिनांक व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एखाद्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित अर्जदारांना 20 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

गोरठा येथे चारा टंचाईच्या वृत्ताची प्रत्यक्ष पाहणीत पडताळणी

  गोशाळेत पुरेशा प्रमाणात कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन नांदेड(जिमाका), दि. १८ : उमरी तालुक्यातील मौजे गो...