Friday, August 21, 2026

 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात CPHC अंतर्गत मातृ व गरोदरपण आरोग्य सेवेवर विशेष भर ; 

100 टक्के शासकीय संस्थेत सुरक्षित प्रसूतीचे आवाहन ! 

प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिपिंपळगाव येथे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न  

नांदेड दि. 21 ऑगस्ट :- ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या घराच्या जवळ मोफत, दर्जेदार आणि सर्वंकष आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 'सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा' (CPHC) प्रशिक्षण अभियान वेगाने राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रोहीपिंपळगाव येथे दोन दिवशीय सखोल प्रशिक्षण वर्ग नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या प्रत्यक्ष नियोजनाखाली जिल्ह्यात १० तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत (ToT Trainers) पूर्ण झाली आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, CHO, आरोग्य सेवक/सेविका व आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. 

 CPHC मधील १४ प्रमुख सेवांपैकी 'मातृ व गरोदरपण आरोग्य सेवा' या विषयात कोणकोणत्या सेवा दिल्या पाहिजेत.

गर्भधारणापूर्व काळजी (Pre-Conception Care): विवाहापूर्वी व गर्भधारणेपूर्वी हिमोग्लोबिन तपासणी, पौष्टिक आहाराचे मार्गदर्शन, फॉलिक ऍसिड गोळ्यांचे सेवन व जोखमीचे आजार टाळण्यासाठी समुपदेशन. 

पहिल्या त्रैमासिकात त्वरित नोंदणी (Early ANC Registration): गर्भधारणा समजताच पहिल्या १२ आठवड्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात नोंदणी व तपासण्यांचे वेळापत्रक निश्चित करणे. 

किमान ४ गुणवत्तापूर्ण गरोदर तपासण्या (ANC Checkups): वजन, रक्तदाब, रक्तातील हिमोग्लोबिन, मधुमेह/साखर, लघवी तपासणी व आवश्यक सोनोग्राफी चाचण्यांची मोफत उपलब्धता. 

औषधोपचार व लसीकरण: टिटॅनस-डिप्थीरिया (TD) लस, नियमित आयर्न-फॉलिक ऍसिड (IFA) व कॅल्शियमच्या गोळ्यांचे नियमित सेवन आणि जंतनाशक उपचार. 

अतिजोखमीच्या गरोदर मातांचा शोध (High-Risk Pregnancy): तीव्र ॲनिमिया, उच्च रक्तदाब किंवा इतर गुंतागुंत असणाऱ्या मातांची तात्काळ ओळख करून विशेष तज्ज्ञ उपचार देणे. 

सुरक्षित मातृत्व: सरकारी आरोग्य संस्थेतच १००% प्रसूती का करावी ? 

मोफत व सुरक्षित सुविधा: प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात २४ तास कुशल वैद्यकीय पथक, प्रसूतीगृह व आपत्कालीन सोयी उपलब्ध. 

शासकीय योजनांचा लाभ: जननी सुरक्षा योजना (JSY), प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत थेट आर्थिक सहाय्य आणि मोफत रुग्णवाहिका (१०२ / १०८) सेवा. 

नवजात बालकाची काळजी: नवजात शिशूंची विशेष देखभाल (SNCU/NBSU) व आवश्यक लसीकरण तत्काळ उपलब्ध. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी गरोदरपणाच्या सुरुवातीपासून ते प्रसूतीपर्यंत सर्व शासकीय आरोग्य सेवांचा पूर्ण लाभ घ्यावा आणि घरगुती प्रसूती टाळून 100 टक्के सुरक्षित प्रसूती सरकारी आरोग्य संस्थेतच करावी.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   जिल्ह्यात CPHC अंतर्गत मातृ व गरोदरपण आरोग्य सेवेवर विशेष भर ;   100 टक्के शासकीय संस्थेत सुरक्षित प्रसूतीचे आवाहन !   ...