वृत्त क्रमांक
नायगाव येथे मेरा रेशीम मेरा अभिमान अंतर्गत रेशीम शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न
केंद्रीय रेशीम बोर्ड मैसूर येथील शास्त्रज्ञ डॉ. अंतरा गुप्ता यांनी केले मार्गदर्शन
दि. 19 रोजी तहसील कार्यालय नायगाव येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील नानाजी देशमुख योजनेअंतर्गत रेशीम घटकासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी शेतकऱ्याना सविस्तर मार्गदर्शन करून रेशीम शेती कशी फायदेशीर आहे हे इतर पिकांचे तुलना करून पटवून सांगितले, केंद्रीय रेशीम बोर्ड म्हैसूर येथील शास्त्रज्ञ डॉ. अंतरा गुप्ता यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक पद्धतीचे माहिती देऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढावे याविषयी सविस्तर माहिती दिली, या कार्यशाळेत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल धुळगुंडे यांनी शेतकऱ्यांना रेशीम शेती करून उत्पन्नात आर्थिक स्थळे मिळवावे असे आवाहन केले, तर मंडळ कृषी अधिकारी बालाजी बच्चेवार यांनी नानाजी देशमुख योजनेची सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम घटकासाठी लाभ घेऊन स्वतःची प्रगती साधावी असे आवाहन केले.
सदरील कार्यक्रमात रेशीमचे क्षेत्र साहेब अमर सूर्यवंशी, तांत्रिक सहाय्यक नरोजी कोरके, सहाय्यक कृषी अधिकारी येरावार्ड साहेब, कृषी अधिकारी म्हैसनवाड आणि जाधव मॅडम शेतकऱ्यांना रेशीम शेती विषयी आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदरील कार्यक्रमात तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मांजरम येथील भुजंग शिंदे, सांगवी येथील माधव पांडे, सुजलेगाव हनुमंत कदम यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेशीम कार्यालय, तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment