वृत्त क्रमांक
महावॉकेथॉन “वॉक फॉर वॉटर”
पाणी आडवा पाणी जिरवाचा गजर...
पाणी आडवा पाणी जिरवा ही शपथ घेत जलसंधारण दिन साजरा
रील स्पर्धेला 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..
नांदेड दि. 21 ऑगस्ट : माती वाचवा-पाणी वाचवा-सुरक्षित भविष्य घडवा, जल है तो कल है, आजचे पाणी संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य, पाणी आडवा पाणी जिरवा… या संदेशांनी परिसर दुमदुमला. महावॉकेथॉनमध्ये भाग घेण्याऱ्यांना मान्यवरांनी दिली जलसंधारण दिनाची शपथ.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जल क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृदा व जलसंधारण विभागाच्यावतीने आज जलसंधारण दिन आणि महावाकेथॉनचे आयोजन शासकीय तंत्रनिकेतन मैदान नांदेड येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार श्रीजयाताई चव्हाण, महापौर कविताताई मुळे, कुलगुरू मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे, मृद व जलसंधारण अधीक्षक अभियंता अजित परांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता श्री. देशमुख यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
या महावाकेथॉनमध्ये नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालय महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, राजर्षी शाहू महाराज हायस्कूल वसंतनगर, केंब्रिज हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, पीपल्स हायस्कूल, के.आर.एम. महाविद्यालय, सम्राट अशोक हायस्कूल, एनएसबी कॉलेज, गुजराती हायस्कूल आदि शाळांमधून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामाच्या चित्र प्रदर्शनी मांडण्यात आल्या होत्या. तसेच जलसंधारण दिनानिमित्त आयोजित भव्य रिल स्पर्धेला मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन अधिकाधिक तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी स्पर्धेची मुदत 30 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असून रिल स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता अनिल कांबळे यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून सुरू झालेल्या 3 किलोमीटरचे महावॉकथॉन व्हीआयपी रोड मार्गे महात्मा फुले चौक, डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल मार्गे शासकीय तंत्रनिकेतन मैदान असे महावॉकेथॉन पार पडले. या महावॉकेथॉनला उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून त्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांची ईश्वरचिठ्ठी काढून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशमुख, विष्णू गोडबोले यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता अनिल कांबळे यांनी मानले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment