Thursday, August 13, 2026

 वृत्त क्रमांक

संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे आयटीआय प्रवेशाची संधी 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्रवेश सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त जागांवर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आयोजित करण्यात येत आहे. ही समुपदेशन फेरी 17 ते 22 ऑगस्ट या कालावधीत दररोज संस्थास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. या फेरीअंतर्गत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. सर्व रिक्त जागांचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येणार आहे. प्रवेश न झालेल्या सर्व उमेदवारांना सदर संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे. 

उमेदवारांनी 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून हजेरी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर दररोज दुपारी 1 वा. संस्थास्तरावर हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. सदर गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना बोलावून उपलब्ध जागांनुसार जागावाटप करण्यात येईल. जागावाटप झाल्यानंतर त्याच दिवशी प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील. 

आजपर्यंत अर्ज न भरलेल्या तथापि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरून प्रवेश शुल्क जमा करावे. त्यानंतर जवळच्या शासकीय अथवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्जाचे निश्चितीकरण करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चितीकरण केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसायाची निवड करता येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींनी औद्योगिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षण घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच उपलब्ध जागांचा विचार करून मोठ्या संख्येने ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून अर्ज निश्चितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य ए. एस. त्रिचुरकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  विशेष लेख महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर ·           २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन   शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ...