वृत्त क्रमांक
बुधवारी फुलवळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा
नांदेड दि. 10 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुलवळ, कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 12 ऑगस्ट 2026 सकाळी 10 वा. पासून स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुलवळ, कंधार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वा.पासून स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुलवळ, कंधार येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.रा.म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
आधिक माहितीसाठी संपर्क सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड. दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment