Thursday, July 2, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

नांदेड, दि. 2 जुलै 2026 : विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज अपर जिल्हाधिकारी  नांदेड डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश कॉलनी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी मतदारांच्या घरी भेट देऊन मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेतले तसेच फॉर्मचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. SIR अभियान प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपायुक्त, महानगरपालिका नितीन गाढवे उपस्थित होते.

यावेळी सोमेश कॉलनी येथील मतदार सुभाषचंद्र लीलाधर शहा तसेच मतदार सौ. श्वेता सुनीलराव वट्टमवार यांनी मतदार गणना प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

पाहणीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ एम. एच. पवार, साहेबराव पांडुरंग जाधव तसेच बीएलओ पर्यवेक्षक श्री. ब्याले यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000




No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...