वृत्त क्रमांक
वन महोत्सव २०२६ ची उत्साहात सुरुवात ; जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते देगलूर नाका येथे घनवन प्रकल्पाचे उद्घाटन
नांदेड, दि. २ जुलै : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान तसेच ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वन महोत्सव २०२६ चे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड यांच्या वतीने देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातील ०.४० हेक्टर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या घनवन रोपवनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरविंद गायकवाड तसेच सहाय्यक वनसंरक्षक नितेश निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपण करून वन महोत्सवाची सुरुवात केली. कार्यक्रमास पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर, वनपाल अशोक कॅदरवाड, वनरक्षक ज्ञानेश्वर मुंडे, सुभाष पिलाजी आणि बळवंत शिंदे यांनीही वृक्षाणात सहभाग घेतला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर यांनी माहिती देताना सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या परिसरात यंदाच्या वन महोत्सवानिमित्त १८ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अंतर्गत ३५ ते ४० विविध देशी वृक्षप्रजातींची घनवन (Miyawaki) पद्धतीने लागवड केली जाणार असून, त्यामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरण संवर्धनास आणि जैवविविधतेच्या संरक्षणास मोठी चालना मिळणार आहे.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान आणि ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment