वृत्त क्रमांक
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनेत
3 जुलैपर्यत त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन
नांदेड दि. 29 जून:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सन 2025-26 मध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ज्या बचत गटांनी विहित मुदतीत अर्ज प्राप्त करून घेतलेले आहेत.
परंतू सदरचा अर्ज भरून परत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेला नाही व ज्यांचे अर्ज तपासणी अंती त्रुटीत आहेत. अशा सर्व बचत गटांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी व त्रुटी पुर्तता करण्यासाठी शेवटची तारीख 3 जुलै 2026 देण्यात आली आहे. तद्नंतर आलेल्या अर्जाचा अथवा त्रुटींचा विचार केला जाणार नाही, ही शेवटची संधी आहे याची सर्व बचत गटांनी गांभिर्यपुर्वक नोंद घ्यावी.
तरी लाभार्थी बचतगटांनी तात्काळ आपले अर्ज सादर करावे व ज्यांचे अर्ज त्रुटीत आहेत त्यांनी त्रुटी पुर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment