वृत्त क्रमांक
लोहा तालुक्यात शेवडी (बा) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न
नांदेड दि. 18 एप्रिल :- सामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने लोहा तालुक्यात चौथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लोहा तालुक्यात शेवडी (बा) येथे नुकतेच संपन्न झाले. आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
शासन नागरिकांच्या दारी येऊन त्यांच्या समस्या सोडवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. समाधान शिबिरामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही वाचला आहे, असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मार्गदर्शन करून शिबिरातील विविध स्टॉला भेटी दिल्या. कामकाजाची पाहणी केली व त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने व उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेवडी (बा) येथे आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये महसूल,कृषी,आरोग्य,पंचायत समिती, भूमी अभिलेख, जि.प.बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक, पशुधन विकास तसेच शिक्षण विभाग अशा विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या आपापल्या विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती देत लाभार्थ्याकडून अर्ज स्वीकारले.
तहसील कार्यालय लोहा यांच्यावतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये ऑनलाईन सातबारा उतारे व आठ-अ उतारे फेरफार उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 20 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय 7/12 व फेरफार, 16 नवीन शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले तसेच शिधापत्रिका दुरुस्त्या संदर्भातील 30 अर्जही स्वीकारण्यात आले. शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे एकूण 13 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, या अभियानांतर्गत जिवंत 7/12 मोहिमेंतर्गत अद्यावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले, 8-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.
तहसिलदार परळीकर यांनी प्रास्ताविकात अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार निळकंठ पांडागळे ग्रा.म. अधिकारी यांनी केले. याप्रसंगी महसूल विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवडी (बा) चे मंडळ अधिकारी के. बी. रेणके, ग्राम महसूल अधिकारी उमाकांत भांगे, मोतीराम पवार, मुर्गेश नाडार, सचिन नरवाडे, निळकंठ पांडागळे, नेताजी रायाजी, कैलास बोधगिरे, निखील सुंदरगिरवार, महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भुवनेश्वर विभुते तसेच कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, महसूल सेवक यांनी उपस्थित राहून या अभियानास सहकार्य केले. नायब तहसिलदार राजेश पाठक, संदीप हाडगे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नागार्जुन खैरे, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी ही उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment