Saturday, April 18, 2026

 वृत्त क्रमांक

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

नांदेड दि. 18 एप्रिल :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या 14 उपकंपन्या या महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीन कल्याणाकरीता बेरोजगारांसाठी स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्गीय प्रवार्गातील गरजु व कुशल व्यावसायीक व्यक्तींना कृर्षी सलग्न व पारंपारीक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापर विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी या महामंडळाच्या योजना आहेत. सदरील सर्व योजनेकरीता महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

थेट कर्ज योजना 1 लाख 

या योजनेमध्ये अर्जदाराचा सिबील केडिट स्कोअर किमान ५०० पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. 1 लक्षपेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल, नियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकरण्यात येईल. 

२० टक्के बीज भांडवल कर्ज योजना  

या योजनेमध्ये ७५ टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमा प्रमाणे राहील २०% रक्कम ही महामंडळची असून त्यावर द.सा.द.शे. ६ टक्के व्याज आकारण्यात येते व ५ टक्के सहभाग हा लाभार्थ्याचा आहे या योजनेची कर्ज मर्यादा रुपये ५ लाखा पर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान ६० हप्त्याचा आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा १५ लक्ष पर्यंतची आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा ८ लक्ष पर्यत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२% च्या मर्या दित ) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा रू. १० लक्ष ते ५० लक्ष पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय १८ ते ४५ वर्षे असावे तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापुर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट. भागीदार संस्थ, सहकारी संस्थ, कंपनी ( कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत ), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिलेल जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशातर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा १० लक्ष ते २० लक्ष पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय १७ ते ३० वर्षे असावे अर्जदाराची कोटोबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा रू.८ लक्ष असावी विद्यार्थी १२ वी ६० टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना 

सदर योजना महिला आर्थीक विकास महामंडळाच्या लोक संचालीत साधन केंद्र ( CMRC ) मार्फत राबविल्या जात असून इतर मागास प्रवर्गातील किमान ५० टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात 5 लक्ष रूपया पर्यत कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम ( १२% च्या मर्यादित ) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. 

या सर्व कर्ज योजना या ऑनलाईन स्वरूपाच्या असून लाभार्थ्याने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावा. सदर योजनेचा लाभा हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कसाठी पत्ता : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड ०२४६२ २२०८६५ हा आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   स्वाधार योजने तील त्रुटी ची पूर्तता करण्यासाठी अंतिम मुदतवाढ   नांदेड , दि. 23 जून :- भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर...