सामाजिक समता सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रम
नांदेड, दि. १३ एप्रिल:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान कार्याक्रम पोर्णीमा नगर बुध्द विहार परिसर येथे राबीवण्यात आला. या कार्याक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे हे होते व प्रमुख पाहूणे दयानंद वाघमारे (नगर सेवक) व ॲड कसबे हे होते .
या कार्यक्रमाची सुरवात तथागत भगवान गौतम बुध्दाच्या मुर्तीस व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अपर्ण करुन स्वच्छता अभियान सुरवारत करण्यात आली़
सदर स्वच्छता अभियान पोर्णीमानगर परिसरातील नागरीक व अधिकारी कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे सहभागी होवून पोर्णीमा नगर बुध्द विहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर स्वच्छता अभियानामध्ये मा.श्री दयानंद वाघमारे नगरसवेक व भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष संघरत्न निवडगे, दिपक शिराढोणकर, दिपक कसबे ,सोहम लोणे सह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी व नागरीक जवळपास 100 ते 150 नागरीकारीक हे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते . तद्नंतर पोर्णीमा नगर बुध्द विहार मध्ये सामुहिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. सदर स्वच्छता अभियान हे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडण्यात आले .
000
No comments:
Post a Comment