वृत्त क्र. 918
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 9 ऑक्टोबर :- नांदेड येथील महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उदया नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी जालना येथून हेलिकॉप्टरने सायंकाळी 4.25 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने नवा मोंढा मैदानाकडे प्रयाण. सायं. 4.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपुजन. सायं. 6 वाजता मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं 6.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment