Wednesday, October 9, 2024

 वृत्त क्र. 920

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वसतिगृहाचे उद्घाटन

·         नांदेड येथील दोन वसतीगृहाचा समावेश


नांदेड दि. 9 ऑक्टोबर :  शासकीय मुलांचे वसतीगृह, काळेश्वर नगर, विष्णुपूरी नांदेड व शासकीय मुलीचे वसतीगृह दिपनगर नांदेड या दोन वसतीगृहासोबत महाराष्ट्रातील 44 वसतीगृहाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दुपारी नागपूर येथून दुरदश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते.


यावेळी महाज्योती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वन सेवेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यामध्ये प्रथमच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेवून लोकसेवा, राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण होतील याबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या.


तसेच नांदेड येथे दोन वसतीगृहाचे दुरदश्य प्रणालीद्वारे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वसतीगृहातील प्रवेशित मुलांनी वसतिगृहामध्ये वास्तव्य करीत शिस्त ठेवावी. अटी व शर्तीचे पालन करावे. राज्यामध्ये प्रथमच विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी वसतिगृह सुरु झाले असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले. तसेच गुणानुक्रमे प्रवेशासाठी पात्र असलेल्या मुला-मुलींना वसतीगृहात प्रवेश निश्चित करण्यासाठी पत्र देण्यात येऊन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...