Friday, December 8, 2023

 पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन

रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मंगळवार 12 डिसेंबर 2023 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com किंवा 02462 (251674)वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा द्विशताब्दी जयंती वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200