रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम करण्यासाठी वाहतुकीस प्रतिबंध
पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत
नांदेड (जिमाका) दि. 8 :- रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम करण्यासाठी बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडर ब्रिज 357 ए मधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंधीत करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.
दिनांक 9 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत पर्यायी मार्ग (जाणे-येणेकरीता) कामठा रोड ते नमस्कार चौक दरम्यानच्या रोड वरील विद्यमान मालटेकडी ओव्हर ब्रीज राहील. तर देगलूर नाका-बाफना टी पॉईंट या रस्त्यावरील विद्यमान बाफना रोड ओव्हर ब्रिज असा राहील. या मार्गावरील वाहतुक वळविणे व पर्यायी मार्गाने ती सोडण्याबाबत अटी व शर्ती जिल्हादंडाधिकारी कार्यालयाची समक्रमांकीत अधिसुचना 9 ऑक्टोंबर 2023 मध्ये नमुद केल्याप्रमाणे कायम असतील, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.
0000
No comments:
Post a Comment