Thursday, July 13, 2023
खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन
खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023
शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 13 :- खरीप हंगाम पीक स्पर्धा 2023 कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.
सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन असे पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्याचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर व संबंधित पिकाचे क्षेत्र पीक स्पर्धा घेण्याइतके म्हणजे 1 हजार हेक्टर पेक्षा जास्त असेल तरचे पिकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 राहिल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये एवढी राहिल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 0401-पिक संवर्धन, 104-शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रकमा, (00)(02)-पिकस्पर्धा योजनेखालील जमा रकमा 0401047301 या लेखाशिर्ष मध्ये चलनाद्वारे शासकीय कोषागारात मुदतीत जमा करावे. पीक स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात भरुन त्यासोबत ठरवून दिलेले शुल्क चलन, सातबारा, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करुन कृषी कार्यालयास द्यावे.
पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल.
खरीप हंगाम 2023 साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...
No comments:
Post a Comment