Thursday, July 13, 2023
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गोडाऊन घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी
गोडाऊन घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 13 :- मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्पन्न वाढीसाठी समुह संसाधन विकास केंद्र स्थापन करणे (गोडाऊन उभारणे) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयात 15 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, बिलोली, धर्माबाद, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस. बऱ्हाटे यांनी केले आहे.
नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनींना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी समुह संसाधन विकास केंद्र स्थापन करणे (गोडाऊन उभारणे) योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हयातील बिलोली (02), धर्माबाद(02), मुदखेड(01), भोकर(02), हिमायतनगर(02), किनवट(01) या तालुक्यांमध्ये 10 समुह संसाधन विकास केंद्र स्थापन करणे (गोडाऊन उभारणे) लक्षांक प्राप्त झाले आहे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या गटांना 75 टक्के अनुदान देण्यात येईल असेही कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक इसापूर उजवा कालवा व सिंचन व्यवस्थेत अनधिकृत हस्तक्षेप केल्यास कठोर कारवाई! • रब्बी हंगाम 2026-27 साठी कलम 163 अन्वये प्रतिबंधा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
No comments:
Post a Comment