Thursday, July 28, 2022

 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह हिमायतनगर येथे प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदपत्रासह शनिवार 20 ऑगस्ट 2022 पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन हिमायतनगर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 1293 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय वि...