Thursday, July 28, 2022

 नांदेड येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय

शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जुन्या प्रकरणावर मुद्रांक शुल्क भरुन घेण्यासाठी त्यावरील देय असणाऱ्या दंडाबाबत दंड सवलत अभय योजना 2022 आहे. या योजनेचा पहिला टप्पा 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. या योजनेत सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास/शास्तीच्या रक्कमेच्या 90 टक्के रकमेसाठी सवलत देय आहे. यासाठी शनिवार 30 जुलै व रविवार 31 जुलै 2022 रोजी अनुक्रमे 5 वा शनिवार व रविवार असल्याने हया अभय योजनेच्या कामकाजासाठी या दोन सुट्टीच्या दिवशी नांदेड येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरु राहणार आहे नागरिकांनी यांची नोंद घ्यावी,  असे मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र.बोराळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...