सुधारीत वृत्त
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रारुप
प्रभाग रचनेची अधिसूचना 2 जून रोजी होणार प्रसिद्ध
नांदेड, (जिमाका), दि. 1 :- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत
समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना दिनांक 2
जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या आदेशाच्या मसुद्याची प्रत ही
जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर,
हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव खै, लोहा,
कंधार, मुखेड, व देगलूर येथील तहसिलदार कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे
फलकावर प्रसिद्ध केले जात आहे. आदेशाच्या मसुदास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास
त्या संदर्भात सकारण लेखी निवेदने/ हरकती/ सूचना तहसिलदार व जिल्हाधिकारी
यांच्याकडे 8 जून 2022 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेली
निवेदने/हरकती/सूचना आदी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन
इटनकर यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment