Monday, January 21, 2019

पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्यावतीने नांदेड येथे
माध्यम कार्यशाळेचे (वार्तालाप) आयोजन
नांदेड दि. 18 :- पत्र सूचना कार्यालय मुंबईच्यावतीने नांदेड येथे माध्यम कार्यशाळेचे (वार्तालाप) गुरुवार 24 जानेवारी 2019 रोजी आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्तालाप कार्यक्रमात मान्यवर विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधतील. पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे या विभागाच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देतील.
या कार्यशाळेचे उद्‌घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता हॉटेल चंद्रलोक, हिंगोली रोड, नांदेड येथे करण्यात येईल. या कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, नांदेड डाक विभागाचे अधीक्षक एस. बी. लिंगायत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर आदि मान्यवर पत्रकारांशी संवाद साधतील .
या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड कार्यालयाच्या dionanded16@gmail.com या ई-मेल पत्यावर पूर्व नोंदणी करुन उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर तसेच पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...