Wednesday, July 5, 2017

मुख्याध्यापक, प्राचार्यांची शुक्रवारी  
पिपल्स महाविद्यालयात बैठक
नांदेड , दि. 5 :- जिल्ह्यातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत, स्वयंअर्थ सहाय्यीत  उ. मा. वि. / क. म. वि. चे  मुख्याध्यापक, प्राचार्यांची आढावा बैठक लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 7 जुलै 2017 रोजी पिपल्स महाविद्यालय नांदेड येथे होणार आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी विहित प्रपत्रात माहितीसह आढावा बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा. ) यांनी केले आहे.
ही बैठक दोन सत्रात अनुदानीत उ. मा. वि. / क. म. वि. यांनी सकाळी 11 वा. तसेच विना अनुदानीत / स्वयंअर्थ सहाय्यीत उ. मा. वि. / क. म. वि. यांनी दुपारी 2 वा. होणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...